Friday, May 21, 2010

घेऊन हाती मशाल क्रांतीची!

घेऊन हाती मशाल क्रांतीची
घालू पालथी अवघी पृथ्वीची,

राजा कुणी ना रंक आता
ह्या तर झाल्या जुन्या बाता,

सान-थोर सारे एक जमू
एकच ध्यासाने आता लढू,

बाजूला ठेऊ सारे पोथी पंथ
आणू एकत्र सारे साधू संत,

राग कुना ना कुणास रुसवा
बासनात आता हो मतभेद वसवा,

तमा न बाळगू आता कुणाची
घराणेशाही राजकारणाची ना पोपटपंची नेत्यांची,

एकदिलाने एकजुटीने आता पुढेच जाऊ
ध्येयप्राप्तीशिवाय न आता माघारी येऊ.

No comments:

Post a Comment