माझं एक काम करशील
त्यांना जाऊन एक विचारशील,
अरे आवडतच होत्या साड्या एवढ्या
तर मागून घायच्या होत्या नवीन आणून दिल्या असत्या,
माझ्या आया - बहिणींच्या नेसत्या साड्या का म्हणून फेडल्या?
भावतात तुम्हास एवढ्याच बांगड्या
तर बोलावला असता एखादा कासार आणि भागवली असती हौस तुमची
पण माझ्या आया - बहिणींची मनगट का म्हणून मोडलीत?
आवडतो तुम्हास एवढा लाठीमार कि घरा-घरात घुसून तुम्ही केलंत रणकंदन,
दिल्या असत्या तुम्हास जुन्या गोधड्या; खुशाल बडवा हव्या तेवढ्या.
लाचारीची भाकरी एवढी का आवडली?
तुम्ही तर शौर्याची परीसीमाच गाठली
कुत्र्यांची ही कोणती जात निघाली ज्याने लांडग्यांना सोडून
शेळ्यावरच झडप घातली
नक्कीच यासाठी विशेष ट्रेनिंग असेल
आणि त्यावर लक्ष लक्ष खर्चही आला असेल
बाकी तुमच्या management चे मात्र कौतुक करावेसे वाटते
अचूक वेळ साधून, टार्गेट पूर्ण करून
पसार कसे व्हावे
हे तुम्हाकडून शिकावेसे वाटते.

No comments:
Post a Comment